'सनी लिओनी' घर पर हैं !

 Goregaon
'सनी लिओनी' घर पर हैं !

फिल्मसिटी - सनी लिओनीचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत, हे काही सांगायला नको. आतापर्यंत ती आपल्याला सिनेमामध्ये दिसली आहे. पण जर तुम्हाला सांगितलं की सनी लवकरच मालिकेमध्ये दिसणार ? हो, सनी लिओनी लवकरच लाइफ ओके वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है' या मालिकेत दिसणार आहे.

सनीने मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. या मालिकेचे चित्रीकरण गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. अंगुरी भाभी (शुभांगी अत्रे), अनिता (सौम्या टंडन), विभूती (आसिफ शेख) आणि मनमोहन (रोहिताश गौड) यांच्यासोबत सनी स्क्रीन शेअर करणार आहे. आपल्या सिनेमाच्या हिरोच्या शोधात सनी दिग्दर्शकासोबत येते, असं कथानक पाहायला मिळेल. सनीच्या फॅन फॉलोअर्ससाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

Loading Comments