स्वरांगी मराठे बनलीय लवंगी बाई

गायिका म्हणून नावारूपाला आल्यानंतर स्वरांगी मराठे अभिनयातही आपलं नशीब आजमावत आहे. सध्या ती लवंगी बाई बनून छोट्या पडद्यावरील रसिकांचं लक्ष वेधण्यात यशस्वी होत आहे.

  • स्वरांगी मराठे बनलीय लवंगी बाई
SHARE

गायिका म्हणून नावारूपाला आल्यानंतर स्वरांगी मराठे अभिनयातही आपलं नशीब आजमावत आहे. सध्या ती लवंगी बाई बनून छोट्या पडद्यावरील रसिकांचं लक्ष वेधण्यात यशस्वी होत आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर उभा करण्यात यशस्वी होत आहे. या मालिकेत सध्या मराठ्यांच्या मुरुड जंजीरा या मोहिमेवर कथानक सुरु आहे.

या कथानकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या लवंगी बाई या व्यक्तिरेखेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री स्वरांगी मराठे साकारत आहे. जंजिरा किल्ल्याचा सुभेदार सिद्धी खैरत याच्या दासीच्या रुपात झळकलेल्या लवंगीनं आपल्या सौंदर्याची भुरळ प्रेक्षकांवर पाडली आहे. स्वरांगी साकारत असलेली लवंगी मराठ्यांच्या इतिहासातील एक गूढ व्यक्तिरेखा आहे. रोह्याच्या खाडीत लपलेल्या मुरुड जंजीऱ्यानं अभेद्य किल्ला म्हणून नावलौकिक मिळवला होता. या किल्यावर भगवा फडकवण्याची जबाबदारी संभाजी महाराजांनी पराक्रमी सरदार कोंडाजी फर्जंद यांच्यावर सोपवली होती.

कोंडाजीबाबांनी जंजीऱ्यावर जाऊन सिद्धी खैरतशी मैत्री केली. दरम्यान सिद्धीनं त्यांना आपली दासी लवंगीभेट स्वरुपात दिली होती. या लवंगी बाईवर कोंडाजी फर्जंद यांचं प्रेम होतं व तिच्यामुळंच मराठ्यांची जंजीरा मोहिम फसली, अशा काही आख्यायिका इतिहासात आहेत. परंतु लवंगीबद्दल अधिकारवाणीनं सांगता येईल अशी कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात लवंगीबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे.हेही वाचा -

Movie Review: कायद्याच्या तराजूतील न्यायनिवाडा
संबंधित विषय
ताज्या बातम्या