SHARE

मुंबई - येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असलेल्या गोलमाल अगेन चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन वर्क सध्या वेगानं चाललं आहे. या चित्रपटाबद्दलची सर्वात ताजी बातमी म्हणजे त्यात झालेली तब्बूची निवड. माचिस, मकबूल, चांदनी बार, हैदर यांसारख्या चित्रपटांमधून गंभीर भूमिका करणारी तब्बू या चित्रपटातून चक्क कॉमेडी करताना दिसणार आहे. रोहित शेट्टींचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये अजय देवगण, परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणार खेमू आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मी एका पद्धतीचा सिनेमा जेव्हा करते, तेव्हा त्याचा अर्थ मी दुसऱ्या पद्धतीच्या सिनेमाचा तिरस्कार करते, असा होत नाही, असे मत अभिनेत्री तब्बूने व्यक्त केलं. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या