Advertisement

मराठी पडद्यावर रंगणार 'फाईट'

बॉलीवूड आणि हॉलिवूड च्या चित्रपटांमध्ये अॅक्शन नेहमीच पहायला मिळते. पण आता मराठीत देखील असाच एक अॅक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फाईट' या चित्रपटाच्या रूपात मराठी सिनेरसिकांना जबरदस्त अॅक्शनपट पहायला मिळणार आहे.

मराठी पडद्यावर रंगणार 'फाईट'
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच आशयघन चित्रपटांची निर्मिती होत असते आणि सुजाण मराठी प्रेक्षकही याच चित्रपटांच्या प्रेमात असतो असं जगभर म्हटलं जातं. पण एखादा वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या वाटेने जाणारा, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी सांगणारा एखादा चित्रपटही इथे डोक्यावर घेतला जातो याची अनेक उदाहरणं आजवर सर्वांनीच पाहिली आहेत. असाच एक काहीसा वेगळा लुक असलेला 'फाइट' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.


मराठीत अॅक्शनपट

बॉलीवूड आणि हॉलिवूड च्या चित्रपटांमध्ये अॅक्शन नेहमीच पहायला मिळते. पण आता मराठीत देखील असाच एक अॅक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फाईट' या चित्रपटाच्या रूपात मराठी सिनेरसिकांना जबरदस्त अॅक्शनपट पहायला मिळणार  आहे. जिमी मोरे दिग्दर्शित या चित्रपटाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.  


विशेष मेहनत

'फाईट' या चित्रपटाची निर्मिती ललित ओसवाल यांनी केली असून, या टीजरमध्ये आपल्या  जबरदस्त फाईट दृश्यांसोबत जीत आणि सायली जोशी हे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटामधील अॅक्शन दृश्यांसाठी विशेष मेहनत घेतली असल्याचंही टीझर पाहिल्यावर जाणवतं. अशा प्रकारच्या अॅक्शनपटांचं मराठी चित्रपटसृष्टीतील प्रमाण खूप अल्प आहे. आजवर आलेल्या चित्रपटांनी विशेष कामगिरी न केल्याने अॅक्शनपटांची निर्मिती करण्याचं धाडस फार कमी दिग्दर्शक करतात. 'फाईट'च्या निमित्ताने पुन्हा एकदा एक नवीन प्रयत्न करण्यात आल्याने उत्सुकता वाढली आहे.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=8Og5b2wxW4M


हेही वाचा - 

रणवीरने कोणाला पाठवला सिक्रेट मेसेज?

मनसेच्या इशाऱ्यानंतर ...घाणेकरचे ४ शो लावण्यास मल्टिप्लेक्सचालक तयार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा