Advertisement

'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच

७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या बोगदा या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे.

'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच
SHARES

काही कलाकारांच्या केवळ असण्यानेच त्या सिनेमाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. ‘बोगदा’ या आगामी मराठी सिनेमाबबतही असंच म्हणता येईल. या सिनेमाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे.



निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 

बौद्धिक आणि आशयघन सिनेमांची निर्मिती करणारी सिनेसृष्टी असा मराठीचा जागतिक पातळीवर नावलौकीक आहे. अशा सिनेमांना जर सर्जनशील दिग्दर्शकाचा स्पर्श लाभला तर, हे सिनेमे नवीन उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा’ हा आगामी मराठी सिनेमादेखील याच धाटणीचा आहे.


माय-लेकीचं ऋणानुबंध

७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझरमध्येही त्यांचं नातं दिसून येतं. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर मनाचा ठाव घेतो.


स्त्रीप्रधान सिनेमा

'बोगदा' हे शीर्षक देखील विचार करायला भाग पाडणारं असून, या सिनेमातील व्यक्तिरेखांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगणारे आहेत. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केलं असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील संभाळली आहे.



हेही वाचा -

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चं नाबाद त्रिशतक

Exclusive: ‘बाजीराव मस्तानी’चे गीतकार होणार दिग्दर्शक!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा