संजूबाबाचा विरासती लुक

संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या 'प्रतिष्ठानम' या हिंदी चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाचा अधिकृत टीजर प्रदर्शित झाल्यानंतर आता संजयचा विरासती लुक रिव्हील करण्यात आला आहे.

संजूबाबाचा विरासती लुक
SHARES

मागील काही दिवसांपासून 'बाबा' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीमुळं चर्चेत असलेला संजय दत्त आता त्याच्या आगामी हिंदी चित्रपटामुळं लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटातील संजयचा विरासती लुक समोर आला आहे.


विरासती लुक रिव्हील 

संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या 'प्रतिष्ठानम' या हिंदी चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाचा अधिकृत टीजर प्रदर्शित झाल्यानंतर आता संजयचा विरासती लुक रिव्हील करण्यात आला आहे. या चित्रपटात संजयनं साकारलेलं बलदेव प्रताप सिंग हे कॅरेक्टर काहीसं राजेशाही थाटातील असल्याचं पोस्टरमध्ये पहायला मिळतं. 'यह गद्दी विरासत से नही काबिलीयत से मिलती है' हे या पोस्टरवर लिहिण्यात आलेलं वाक्य चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवणारं आहेच, पण त्यासोबतच संजयची भूमिका नेमकी कशा प्रकारची आहे याबाबतही कुतूहल जागवणारं आहे.


२० सप्टेंबरला रिलीज 

संजयनं आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये भाईची भूमिका साकारली आहे. 'प्रतिष्ठानम'मधील संजयचा लुक जरी काहीसा राजेशाही थाटातील दिसत असला तरी समोर ठेवलेलं रिव्हॅाल्हर मात्र या कॅरेक्टरबाबतचं रहस्य वाढवणारं आहे. कपाळावर लाल टिळा, डोळ्याला चष्मा, कुर्ता-पायजमा, जॅकेट आणि हातात सिगार घेऊन एका राजेशाही खुर्चीत बसलेला संजय या पोस्टरमध्ये दिसतो. २० सप्टेंबरला रिलीज होणारा हा पॅालिटीकल-अॅक्शन-ड्रामा २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रतिष्ठानम' या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हिंदी भाषेत चित्रपट बनवतानाही टायटल सेम ठेवण्यात आलं आहे.


हिंदी रिमेक

संजय एस. दत्त प्रोडक्शन्स अंतर्गत मान्यता दत्त या चित्रपटाची निर्मिती करत आहे. मूळ तमिळ चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या देव कट्टा यांनीच हिंदी रिमेकचंही दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात संजयच्या जोडीला मनीषा कोईराला, जॅकी श्रॅाफ, चंकी पांडे, अली फजल, सत्यजीत दुबे, अमायरा दस्तूर अशी स्टारकास्ट आहे. देव कट्टा यांनीच या चित्रपटाचं लेखन केलं असून, संगीत इलायराजा यांचं आहे. हेही वाचा  -

गृहप्रवेशाच्या दिवशी श्री लक्ष्मी-श्री विष्णू विरह

किशोरी बनल्या बिचुकलेची आईसंबंधित विषय