‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन

Ravindra Natya Mandir, Mumbai  -  

प्रभादेवी -  चित्रपट रसिकांसाठी रवींद्र नाट्यमंदिरात 15 व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाची मेजवानी मिळणाराय. गुरुवारी 15 व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचं थाटामाटात उद्घाटन झालं. प्रभादेवीतल्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत रंगलेल्या या महोत्सवाचं उद्‌घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केलं. या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते ‘एशियन फिल्म कल्चर अॅवॅार्ड’नं सन्मानित केलं.

या महोत्सवाचं नियोजन सुधीर नांदगावकर यांनी केलं. तर अध्यक्षपद किरण शांताराम यांनी भूषवलं.या महोत्सवाला अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी हजेरी लावली होती. 

या महोत्सवात इराण, नेपाळ, जपान बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम, लेबेनॉन इत्यादी देशातील आशयघन चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटाच्या वेगळ्या विभागांतर्गत मराठी चित्रपटांचा आस्वादही महोत्सवात घेता येणाराय.

Loading Comments