सहकारी मनोरंजन मंडळाचा वर्धापनदिन

 BMC office building
सहकारी मनोरंजन मंडळाचा वर्धापनदिन
सहकारी मनोरंजन मंडळाचा वर्धापनदिन
सहकारी मनोरंजन मंडळाचा वर्धापनदिन
सहकारी मनोरंजन मंडळाचा वर्धापनदिन
See all
BMC office building, Mumbai  -  

परळ - सहकारी मनोरंजन मंडळाचा 94 वा वर्धापनदिन सोहळा शनिवारी दामोदर नाट्यगृहात झाला. रंगभूमीसाठी योगदान देणार्‍या रंगकर्मींचा या वेळी पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला. या वर्षी दत्ताराम स्मृती पुरस्कार जयंत सावरकर यांना देण्यात आला. आनंदा नांदोस्कर यांना भालचंद्र पेंढारकर स्मृती, रमेश भिडे यांना ना. म. जोशी स्मृती, प्रताप आयरे यांना सुकुमार नागोटकर स्मृती आणि आशालता महाजन यांना जयश्री शेजवाडकर स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

मंडळातर्फे 'अवघा रंग सुरांचा' हा सुप्रसिद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम या वेळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर झाला. विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं. गायन स्पर्धा, एकपात्री अभिनय, एकांकिका लेखन स्पर्धांतल्या विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली. या वेळी आमदार अजय चौधरी, सहकारी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, सचिव के. राघव कुमार आदीही उपस्थित होते.

Loading Comments