• दोस्तीगिरीचं टायटल ट्रॅक ‘तुझी माझी यारी दोस्ती’ रिलीज
SHARE

मैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या ‘दोस्तीगिरी’ सिनेमातील ‘तुझी माझी यारी दोस्ती...’ हे गाणं रिलीज झालं आहे. जागतिक मैत्री दिनाच्या सुमारास रिलीज झालेल्या या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा आहे.


मैत्रीच्या भावना गाण्यातून

‘तुझी माझी यारी दोस्ती...’चं संगीत दिग्दर्शन रोहन-रोहन यांनी केलं आहे. त्यांनीच गायिका प्राजक्ता शुक्रेसोबत हे गाणंही गायलं आहे. याविषयी रोहन-रोहन म्हणतात की, आम्हा दोघांची मैत्री आमच्या संगीताविषयीच्या आवडीमुळे झाली. त्यानंतर आम्ही एकत्र काम करू लागलो. त्यामुळे मैत्रीचं नातं आम्हा दोघांसाठी खूप स्पेशल आहे. आम्ही आमच्या भावनाच या गाण्यातून व्यक्त केल्या आहेत.


गाण्याच्या शूटिंगमध्ये घट्ट मैत्री

अभिनेता संकेत पाठक सांगतो की, हे गाणं अक्षय, विजय, पुजा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण या गाण्यानंच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान एकमेकांना अनोळखी असलेल्या आम्हा अॅक्टर्सची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली. या गाण्याच्या शुटिंगच्यावेळी आम्ही केलेली धमाल तर अविस्मरणीय आहे.


२४ ऑगस्टला प्रदर्शित 

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित ‘दोस्तीगिरी’ सिनेमाचं लेखन मनोज वाडकर यांनी केलं आहे. रोहन-रोहन यांच्या संगीतानं सजलेल्या या सिनेमात संकेत पाठक, पुजा मळेकर, विजय गिते, पुजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स प्रस्तुत मोरया मुव्हिज क्रिएशन्स निर्मित ‘दोस्तीगिरी’ २४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

'फ्रेंडशिप डे' निमित्त एचआयव्हीग्रस्त मुलांची अनोखी 'पार्टी'

तुकाबाबाच्या भेटीची आस अन् पुष्पक विमानाचा ध्यास
संबंधित विषय
ताज्या बातम्या