Advertisement

'फ्रेंडशिप डे' निमित्त एचआयव्हीग्रस्त मुलांची अनोखी 'पार्टी'

‘पार्टी’ सिनेमाच्या टीमने नुकताच गोरेगाव येथील एचआयव्हीग्रस्त मुलांचं संगोपन करणाऱ्या डीझायर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमध्ये अनोख्या पद्धतीनं 'फ्रेंडशिप डे साजरा केला.

'फ्रेंडशिप डे' निमित्त एचआयव्हीग्रस्त मुलांची अनोखी 'पार्टी'
SHARES

सचिन दरेकर दिग्दर्शित मैत्रीची परिभाषा मांडणाऱ्या ‘पार्टी’ सिनेमाच्या टीमने नुकताच गोरेगाव येथील एचआयव्हीग्रस्त मुलांचं संगोपन करणाऱ्या डीझायर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमध्ये अनोख्या पद्धतीनं 'फ्रेंडशिप डे साजरा केला.


'भावड्या…' गाण्यावर ठेका 

‘पार्टी’मधील कलाकारांनी सर्व मुलांशी संवाद साधत, त्यांना भेटवस्तूदेखील दिल्या. संस्थेच्या मुलांनीही 'पार्टी’ सिनेमातील 'भावड्या…' या गाण्यावर ठेका धरत, फ्रेंडशिप डेच्या या धम्माल 'पार्टी'चा मनमुराद आनंद लुटला. नवविधा प्रोडक्शन निर्मित आणि निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स प्रस्तुत 'पार्टी' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

मैत्रीवर आधारित गाणं

सिनेमातील 'भावड्या…' या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, संगीतसृष्टीतील दोन मित्रांनी, मैत्रीवर आधारित असलेलं हे गाणं, खास मित्रांसाठी सादर केलं आहे. अवधूत गुप्ते आणि अमितराज या जुन्या मित्रांचं हे गाणं 'फ्रेंडशिप डे'च्या मुहूर्तावर लाँच करण्यात आल्यामुळे या गाण्याला चांगली प्रसिद्धी मिळेल, अशी आशा आहे. अमितराजच्या चालीवर अवधूतने गायलेल्या या गाण्याचं लिखाण सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी केलं आहे.


५० किलो हळदीचा वापर

मित्राच्या हळदीचं हे गाणं प्रेक्षकांना वेड लावणारं आहे. रात्री चित्रीत झालेल्या या गाण्याच्या चित्रीकरणासाठी कलाकारांनी सलग दोन रात्र काम केलं होतं. या गाण्यात हळदीचा माहोल उभा करण्यासाठी तब्बल ५० किलो हळदीचा वापर करण्यात आला असल्याचं समजतं. या 'पार्टी'चा रंग चढवणाऱ्या सिनेमात सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला प्रमुख भूमिकेत अाहेत.  या सहाजणांची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा प्रेक्षकांना 'फ्रेंडशिप डे'चं अनोखं सरप्राईज घेऊन येत आहे.



हेही वाचा -

तुकाबाबाच्या भेटीची आस अन् पुष्पक विमानाचा ध्यास

स्वप्नील-मुक्ताच्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ला ७ डिसेंबरचा मुहूर्त



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा