' वजनदार ' ट्रेलर

मुंबई - सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांचा आगामी चित्रपट वजनदारचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नेहमीच आपल्या वजनाची काळजी घेणाऱ्या अभिनेत्री या चित्रपटात वजन वाढलेल्या दिसणार आहेत. सचिन कुंडलकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमात दोन बारीक होण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रियांची गोष्ट रेखाटण्यात आली आहे. त्यांचं बारीक होण्याचं हे मिशन कशा पद्धतीने सफल होतं आणि यादरम्यान कोणकोणते ट्विस्ट अँड टर्न्स येतात, हे सारं ‘वजनदार’ या सिनेमात पाहायला मिळेल. येत्या ११ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Loading Comments