'महर्षी' महेशबाबूला पाहून फॅन्स का झाले सुपर क्रेझी!

'महर्षी'च्या ट्रेलरमध्ये महेशबाबू विविध लुकमध्ये दिसतो. या चित्रपटात महेशबाबू ऋषी नावाच्या एका कॅालेज बॅायच्या भूमिकेतही आहे आणि व्यावसायिकाच्याही. याशिवाय तो शेतात नांगर चालवतानाही दिसतो. हा एक व्यावसायिक आहे, जो कधीही पराभूत झालेला नाही.

SHARE

दक्षिणेकडील सुपरस्टार महेशबाबू मागील काही दिवसांपासून 'महर्षी' या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यातील महेशबाबूचं डॅशिंग आणि दिलखेचक रूप पाहून चाहते अक्षरश: सुपर क्रेझी झाले आहेत.


महेशबाबू विविध लुकमध्ये

'महर्षी'च्या ट्रेलरमध्ये महेशबाबू विविध लुकमध्ये दिसतो. या चित्रपटात महेशबाबू ऋषी नावाच्या एका कॅालेज बॅायच्या भूमिकेतही आहे आणि व्यावसायिकाच्याही. याशिवाय तो शेतात नांगर चालवतानाही दिसतो. हा एक व्यावसायिक आहे, जो कधीही पराभूत झालेला नाही. प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेल्या महेशबाबूला जगावर राज्य करायचं आहे. यातील त्याचा चॉकलेटी लुक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आहे. एका सुंदर लोकेशनवर सूटबूटामध्ये विमानातून उतरताना महेशबाबू ट्रेलरमध्ये दिसतो. त्याच्या मुखातील दमदार डायलॉग प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी पुरसे आहेत. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार की एकेरी हे कोडं मात्र ट्रेलर पाहिल्यावर उलगडत नाही.


९ मे रोजी रिलीज

गत वर्षी प्रदर्शित झालेल्या 'भारत अने नेनु' या चित्रपटात मुख्यमंत्री भारतची यशस्वी भूमिका साकारल्यानंतर महेशबाबू आता 'महर्षी'मध्ये एक यशस्वी व्यावसायिकाच्या भूमिकेतही दिसणार आहे. वामसी पैडीपल्ली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'महर्षी'मध्ये महेशबाबूच्या जोडी पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय प्रकाश राज, मिनाक्षी दीक्षित, मुकेश ऋषी, नस्सार, जगपथी बाबू, अल्लारी नरेश, राजेंद्र प्रसाद, साई कुमार आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ९ मे रोजी रिलीज होणार आहे.हेही वाचा -

टायगर-आलियाचं 'हुकअप साँग'

श्रीदेवीच्या दुसऱ्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
संबंधित विषय
ताज्या बातम्या