'बिग बॉस'चा आवाज महिलेचाच हवा- तृप्ती देसाई


'बिग बॉस'चा आवाज महिलेचाच हवा- तृप्ती देसाई
SHARES

मुंबई - आता एकही माणूस असा सापडणार नाही जो 'तृप्ती देसाई' ला ओळखत नसेल. त्याला कारणही तसाच आहे म्हणा , शनिशिंगणापूरच्या मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश असो,किंवा हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश असो महिलांचा आवाज मांडण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय. आणि ह्याच प्रकरणामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्यात. पण आता तृप्ती देसाई चर्चेत येण्याचं कारण वेगळंच आहे. लवकरच आपल्यासमोर 'बिग बॉस सीजन १०' येणार आहे आणि त्या सिझन मध्ये ' तृप्ती देसाई' ला सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे असं समजलंय, पण इथे ही तृप्ती देसाईने एक वेगळीच अट वाहिनीपुढे ठेवलीय. बिग बॉसचा आवाज जर महिलेचा असेल तरच मी ह्या शो मध्ये सहभागी होण्याच्या  प्रस्तावाचा विचार करेन असं त्यांनी वाहिनीला कळवलं आहे. आतापर्यंत गेल्या दहा पर्वांपासून सुप्रसिद्ध व्हॉईस आर्टिस्ट अतुल कुमार बिग बॉससाठी आवाज देतात आणि हा आवाजच बिग बॉसची ओळख बनला आहे, पण तृप्ती देसाईंच्या अशा अटीमुळे आता वाहिनी तृप्ती देसाईंच्या पुढे झुकेल का हे पाहणं खरं औस्तुक्याच ठरेल. 

संबंधित विषय