'बिग बॉस'च्या घरात काहीतरी 'शिजतंय'!


'बिग बॉस'च्या घरात काहीतरी 'शिजतंय'!
SHARES

'बिग बॉस'मध्ये आपल्याला रोजच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. कोणाचं प्रेम, तर कोणाचं भांडण. टीआरपी आणि पब्लिसिटीसाठीच 'बिग बॉस' या प्लॅटफॉर्मचा जास्त वापर केला जातो. 'बिग बॉस'मध्ये जेवणाचा मुद्दा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. याच जेवणावरून 'बिग बॉस'च्या घरात आपण नेहमीच कितीतरी वाद झालेले पहिले आहेत.आता 'बिग बॉस'च्या घरात डाळ 'शिजतेय' आणि ती डाळ 'बिग बॉस'च्या घरात बदल घडवून आणणार असं दिसतंय. 'वूट' वर नुकताच रिलीज झालेल्या 'बिग बॉस-११'च्या 'अनसिन अनदेखा'मध्ये सब्यसाचीने घरातील इतर सदस्यांसाठी उरलेल्या डाळीलाच ट्विस्ट देऊन रुचकर डाळ बनवली आणि त्या डाळीला जेव्हा शिल्पा शिंदेनं चाखलं, तेव्हा तिला ती डाळ एवढी आवडली की तिने सब्यसाचीला मिठीच मारली!सब्यसाची आणि शिल्पा हे दोघेही 'बिग बॉस-११'मधील अतिशय आक्रमक सदस्य आहेत. आता सब्यसाचीने बनवलेल्या डाळीची जादू शिल्पावर होऊन काही वेगळ्या गोष्टी 'बिग बॉस'च्या घरात घडतात का? हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे!

 


'अनसिन अनदेखा' चा एपिसोड तुम्ही http://bit.ly/2xAs5CM या लिंक वर पाहू शकता. हेही वाचा

'बिग बॉस'मध्ये पहिल्याच दिवसापासून राडा!


संबंधित विषय