Advertisement

छोट्या पडद्यातले कलाकार 'ह्या गोजिरवाण्या घरात'


SHARES

मुंबई - व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना सध्या सुगीचे दिवस आले आहे. उत्कृष्ट कथानक आणि नेपथ्य यांच्या जोरावर अनेक नाटकांनी मायबाप रसिकांच्या मनात आपली हक्काची जागा मिळवली आहे. त्यामुळेच तर अनेक कौटुंबिक नाटकांना देखील रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. वेद प्रोडक्शन निर्मित आणि मुक्तायन प्रस्तुत 'ह्या गोजिरवाण्या घरात' हे कौटुंबिक नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे.
मानस लयाळ लिखित या नाटकांमध्ये सुप्रिया पाठारे, साईकीत कामत आणि अदिती द्रविड हे तीन कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. छोटा पडदा गाजवणारे हे तिन्ही कलाकार 'ह्या गोजिरवाण्या घरात' या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच एकत्र रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा