कोण आहे कपिल शर्माची गर्लफ्रेंड?

 Mumbai
कोण आहे कपिल शर्माची गर्लफ्रेंड?
Mumbai  -  

मुंबई - देशातला एक प्रसिद्ध कॉमेडियन आणि हसवून हसवून सर्वांची विकेट काढणारा कपिल शर्मा मात्र स्वत:च क्लिन बोल्ड झालाय. आणि त्याची विकेट काढली आहे गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिने. कपिल शर्माने सगळ्यांसमोर आपलं प्रेम जाहीरही केलं आहे.


कपिल शर्माने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो गिन्नी चतरथ सोबत दिसत आहे. कपिलने ट्विटरवर म्हटलं आहे की, 'मी तिला माझी अर्धांगिणी तर नाही म्हणणार पण ती मला पूर्ण करते. लव यू गिन्नी. मी हिच्यावर खूप प्रेम करतो'. अशा शब्दांत त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. गिन्नी कपिलसोबत 'हस बलिये' शोमध्ये दिसली होती. गिन्नीचं खरं नाव भवनीत चतरथ आहे. आता कपिलच्या चाहत्यांना या दोघांच्या लग्नाविषयी उत्सुकता लागली आहे.

Loading Comments