• 'या' स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम!
  • 'या' स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम!
  • 'या' स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम!
  • 'या' स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम!
  • 'या' स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम!
  • 'या' स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम!
SHARE

'सन्मान स्त्रीच्या लढण्याचा, गौरव तिच्या भिडण्याचा' हे ब्रीद घेऊन यावर्षीचा ‘उंच माझा झोका पुरस्कार’ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यातील अनेकींचं कार्य प्रकाशझोतात आलंय आहे, तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव‘उंच माझा झोका पुरस्कार’ देऊन करण्यात येतो. 

यावर्षी आदिवासींची घरठाणाची चळवळ चालवणा-या डॉ. वैशाली पाटील, दृष्टीहीन तथा दिव्यांग मुलामुलींची शाळा चालवणा-या प्रमिला कोकड, रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर, घनकचरा व्यवस्थापन आणि वेस्ट मॅनजमेंटमधून रोजगार निर्मिती करणा-या निर्मला कांदळगावकर, आपल्या अभिजात साहित्याने मराठी साहित्यक्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणा-या अरुणा ढेरे, न्युरोसायन्ससारख्या विषयात आपल्या संशोधनाची पताका फडकविणा-या डॉ. विदिता वैद्य यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
या वेळी प्रगती प्रतिष्ठानच्या सुनंदा पटवर्धन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारांच्या निवड समितीची जबाबदारी ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांनी पार पाडली. येत्या २७ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. झी मराठी या वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या