Advertisement

सिनेमाद्वारे होणार 'अॅट्रॉसिटी' कायद्याबद्दल जनजागृती


सिनेमाद्वारे होणार 'अॅट्रॉसिटी' कायद्याबद्दल जनजागृती
SHARES

सिनेसृष्टीत आता बरेच असे सिनेमे येऊ लागले आहेत, ज्यात मनोरंजनाबरोबरच समाजातील सत्य मांडण्याचंही काम केलं जातं. लवकरच आजच्या समाजातील ज्वलंत वास्तव दाखवणारा ‘अॅट्रॉसिटी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिलीप शुक्ला यांच्या हस्ते संपन्न झाला. आजवर नेहमीच दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक दीपक कदम यांनी ‘अॅट्रॉसिटी’चं दिग्दर्शन केलं आहे.



कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातात, पण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. ‘अॅट्रॉसिटी’ हा देखील एक असाच कायदा आहे, ज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. त्यामुळे समाजातील ज्या दुर्बल घटकांसाठी हा कायदा बनवण्यात आला, ते याचा उपभोग घेऊ शकत नाहीत. अशा घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे यांनी ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल या नवोदित कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. १२ जानेवारीला ‘अॅट्रॉसिटी’ सिनेमा रिलीज होणार आहे.



हेही वाचा

फातिमा सना शेख पुन्हा चर्चेत..इंस्टाग्रामवर टाकला 'शेमलेस सेल्फी'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा