खेळाडूंच्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘वलय’

 Mumbai
खेळाडूंच्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘वलय’

मुंबई - आयुष्यात ध्येयप्राप्तीपर्यंतचा मार्ग कधीच सोपा नसतो. प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनुभवाची हिच शिदोरी यशाच्या मार्गाकडे जाण्याचा रस्ता दाखवत असते. कोणतंही क्षेत्र त्याला अपवाद नाही. खेळाडूलासुद्धा या संघर्षाचा सामना करावाच लागतो. अशाच एका गुणी खेळाडूच्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘वलय’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाखा मिडिया वर्क्स निर्मित आणि निकी बत्रा दिग्दर्शित या सिनेमाचे शुटिंग झाले असून, त्यातील काही दृश्ये नुकतीच फिल्मसिटी मध्ये चित्रित झाली. नागपूरमध्ये चित्रपटाचा काही भाग चित्रीत केला जाणार आहे.
अशोक कुंदनानी निर्मित ‘वलय’ या चित्रपटात अनिकेत केळकर, रेशम टिपणीस, सुरेखा कुडची, अभिलाषा पाटील, अमिषा आंबेकर, प्रदीप पाटील, अनिकेत मोगरे, प्रतीक भोसले, वैभव आमटे, अमित लेखवानी, सायरा खान, पूजा बनसोडे, रुसान शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘वलय’ चित्रपटाचे गीतलेखन आणि संगीत प्रकाश प्रभाकर यांचे आहे.

Loading Comments 

Related News from मनोरंजन