Advertisement

'देख भाई देख'च्या लाडक्या शम्मी आंटींचं निधन


'देख भाई देख'च्या लाडक्या शम्मी आंटींचं निधन
SHARES

'देख भाई देख'मधल्या लाडक्या शम्मी आंटी यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. शम्मी अनेक दिवसांपासून आजारी होत्या. सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवरून शम्मी यांच्या निधनाची बातमी देत दु:ख व्यक्त केलं.


 

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी 'उस्ताद पेड्रो' हा पहिला चित्रपट साईन केला. पुढे 'मल्हार' या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण २०० हून अधिक चित्रपट केले. त्याचबरोबर त्या छोट्या पडद्यावरही दिसल्या. देख भाई देख, जबान संभाल के, फिल्मी चक्की या टीव्ही मालिकांमध्ये त्या दिसल्या. शम्मी यांनी नर्गिस, मधुुबाला, दिलीप कुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे.


   

शम्मी यांचं खरं नाव नर्गिस रबाडी आहे. २४ एप्रिल १९२९ मध्ये गुजरातच्या नारगोल संजान येथे पारसी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नर्गिस या अगदी योगायोगाने चित्रपटसृष्टीत आल्या. दिग्दर्शक तारा हरिश यांनी नर्गिस यांना त्यांचं नाव बदलून शम्मी नाव ठेवण्याचा सल्ला दिला. कारण नर्गिस नावाची एक अभिनेत्री याअाधीच चित्रपटसृष्टीत होती. त्यानंतर नर्गिस यांनी आपलं नाव बदलून शम्मी ठेवलं.


   
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा