'बेगम जान'मध्ये विद्या पुन्हा बोल्ड अंदाजात

 Andheri
'बेगम जान'मध्ये विद्या पुन्हा बोल्ड अंदाजात
Andheri, Mumbai  -  

मुंबई - अभिनेत्री विद्या बालनचा आगामी सिनेमा 'बेगम जान' चा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये विद्या अत्यंत बोल्ड भूमिकेत दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीजीत मुखर्जींनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा भारत-पाकिस्तानच्या फाळणीवर आधारीत आहे. फाळणीनंतर बेगम जान यांच्या अडचणी वाढतात. या भोवती हा चित्रपट गुंफण्यात आला आहे. या सिनेमात विद्याचे अत्यंत बोल्ड डायलॉग आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात पल्लवी शारदा, गौहर खान आणि चंकी पांडे या सर्व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यासह इला अरुण, प्रियंका सेठिया, फ्लोरा सैनी, रिधिमा तिवारी, रवीजा चौहान, पूनम राजपूत, रजत कपूर आणि इतर कलाकारांनीही चांगला अभिनय केलाय.
या सिनेमातील गाणी कौसर मुनीर यांनी लिहिली असून या गाण्यांना अनु मलिक यांनी संगीत दिलय. हा सिनेमा 14 एप्रिल 2017 ला चित्रपटगृहात झळकणार आहे. 

                                   (Video Credit-Vishesh Films)


Loading Comments