Advertisement

विरुष्काच्या इटली ट्रीपचे फोटो पाहिलेत का?

अनुष्का सध्या विराटसोबत इटलीमध्येच सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. 'सध्या स्वर्गात आहे', अशी कॅप्शनही तिनं फोटोला दिलं आहे.

विरुष्काच्या इटली ट्रीपचे फोटो पाहिलेत का?
SHARES

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी नुकतीच विवाह बंधनात अडकली. त्यांचं लग्न सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर आता ही जोडी हनिमूनला गेली आहे. अनुष्का शर्मानं हनिमून ट्रीपचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


https://www.instagram.com/p/Bct1ME7ggio/ data-instgrm-version="8" style=" background:#FFF; border:0; border-radius:3px; box-shadow:0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width:658px; padding:0; width:99.375%; width:-webkit-calc(100% - 2px); width:calc(100% - 2px);">

https://www.instagram.com/p/Bct1ME7ggio/" style=" color:#c9c8cd; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none;" target="_blank">A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


अनुष्का सध्या विराटसोबत इटलीमध्येच सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. 'सध्या स्वर्गात आहे', अशी कॅप्शनही तिनं फोटोला दिलं आहे.

'विरुष्का' जोडीनं लग्नानंतर मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये विराट आणि अनुष्का या दोघांनी मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वरळी परिसरात एक आलिशान घर विकत घेतलं आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हीही चकित व्हाल! जवळपास 34 कोटींच्या घरात विरुष्का आपला संसार थाटणार आहेत.

लवकरच विराट मुंबईत येणार आहे. त्याआधी 21 डिसेंबरला दिल्लीत विराट जंगी पार्टी देणार आहे. दिल्लीतल्या ताज हॉटेलमध्ये देण्यात येणाऱ्या पार्टीत फक्त निकटवर्तीय असणार आहेत. त्यानंतर 26 डिसेंबरला मुंबईत बॉलिवूड आणि क्रीडा विश्वातील खास पाहुण्यांसाठी खास पार्टीचं आयोजन केलं आहे.हेही वाचा

अशी सुरू झाली विराट-अनुष्काची लव्हस्टोरी!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement