Advertisement

डाॅ. मोहन आगाशेंना विष्णूदास भावे पुरस्कार

रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वी मुशाफिरी करणाऱ्या डाॅ. मोहन आगाशे यांचा रंगभूमीदिनी विष्णूदास भावे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल. नाट्यसंमेलनाध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्या हस्ते आगाशे यांना गौरविण्यात येईल.

डाॅ. मोहन आगाशेंना विष्णूदास भावे पुरस्कार
SHARES

अनोख्या अभिनय शैलीच्या बळावर मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री डाॅ. मोहन आगाशे यांना रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णूदास भावे पुरस्कार घोषित झाला आहे.

रंगभूमीदिनी पुरस्कार

रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वी मुशाफिरी करणाऱ्या डाॅ. मोहन आगाशे यांचा रंगभूमीदिनी विष्णूदास भावे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल. नाट्यसंमेलनाध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्या हस्ते आगाशे यांना गौरविण्यात येईल. २५ हजार रुपये, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे.


सामनाद्वारे एंट्री 

पुण्यामध्ये शिक्षण घेत असतानाच आगाशे यांना अभिनयाची गोडी लागली. त्यातच त्या काळातील दिग्गज अभिनेते उत्पल दत्त यांच्या अभिनयाच्या प्रेमात असल्याने अागाशेंचा कल अभिनयाकडेच होता. सुरुवातीच्या काळात रंगभूमी आणि नंतर चित्रपटांकडे वळलेल्या आगाशे यांनी दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या ‘सामना’द्वारे मोठ्या पडद्यावर एंट्री केली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली रहस्यमय मारुती कांबळे ही व्यक्तिरेखा खूप गाजली. त्यानंतर ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘सिंहासन’ या एका पेक्षा एक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. आगाशे यांनी ‘जैत रे जैत’मध्ये साकारलेली नाग्याची भूमिका संस्मरणीय ठरली. गत वर्षी प्रदर्शित झालेल्या पुरस्कार विजेत्या ‘कासव’ या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता.

इंग्रजी, उर्दू, बंगालीमध्ये अभिनय

१९७६ मध्ये रंगभूमीवर आलेल्या विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात आगाशेंनी सादर केलेले नाना फडणवीस आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘गुंतता हृदय हे’, ‘रुद्रम’ या अलीकडच्या काळातील मालिकांमध्येही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं. आजवरच्या कारकिर्दीत आगाशे यांनी मराठी-हिंदीसह इंग्रजी, उर्दू, बंगाली, मल्याळम, तमिळ भाषांमधील कलाकृतींमध्येही अभिनय केला आहे.



हेही वाचा -

आदिती द्रविड म्हणतेय ‘यू अँड मी'


‘वी आर प्रेग्नंट’ म्हणत परतली सुपरहिट जोडी!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा