Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

आदिती द्रविड म्हणतेय ‘यू अँड मी'

‘यू अँड मी’ हे नवं कोरं सिंगल गाणं नुकतंच यूट्युबवर रिलीज करण्यात आलं आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत इशाची भूमिका साकारणाऱ्या आदिती द्रविडसोबत याच मालिकेतील शनाया म्हणजेच रसिका सुनीलही या गाण्यात आहे.

आदिती द्रविड म्हणतेय ‘यू अँड मी'
SHARES

अभिनेत्री आणि गीतकार अदिती द्रविडचं ‘यू अँड मी’ हे नवं कोरं सिंगल गाणं नुकतंच यूट्युबवर रिलीज करण्यात आलं आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत इशाची भूमिका साकारणाऱ्या आदिती द्रविडसोबत याच मालिकेतील शनाया म्हणजेच रसिका सुनीलही या गाण्यात आहे.


गाण लिहलंही आणि गायलंही

अभिनेत्री-गीतकार आदिती द्रविडने या अगोदर झी टॉकीजसाठी ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ हे गाणं लिहीलं होतं. यासोबतच यंदाच्या गणेशोत्सवात ‘नमन तुला श्रीगणराया’ हे तिचं गाणं गाजलं होतं. आता तिचं तिसरं गाणं रसिकांसमोर आलं आहे. ‘यू अँड मी’ हे गाणं आदितीने लिहीलं आणि गायलंही आहे. तर सई-पियुषने या गाण्याला संगीत दिलं आहे.


आदिती म्हणते...

आपल्या नव्या ‘यू अँड मी’ या सिंगलविषयी आदिती म्हणाली की, मी आणि रसिका जीवलग मैत्रिणी आहोत. आमच्या मैत्रीला समर्पित करणारं एक गाणं घेऊन यावं असं वाटत होतं. त्यामुळे शब्द आपोआपच सूचत गेले.

युथफुल शब्द, त्यालाच साजेसं चित्रीकरण आणि डान्स मुव्जमुळे हे गाणं तरुणाईला आवडेल अशी आशा आहे. आम्ही या गाण्यासाठी जवळजवळ डझनभर कॉस्च्युम्स वापरले आहेत. एखाद्या बिग बजेट हिंदी फिल्मच्या भव्यतेची अनुभूती हे गाणं पाहताना रसिकांना नक्कीच येईल.हेही वाचा - 

आठ वर्षांनी नवरा-बायको पुन्हा एकत्र

Exclusive : मृणाल कुलकर्णी पुन्हा ठरणार सरप्राइज पॅकेज!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा