'अण्णा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा 'अण्णा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलरही लॉन्च झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन शशांक उडापूरकर यांनी केले आहे. सिनेमात शशांक स्वतः अभिनय करताना पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री काजोलची बहीण तनिशा मुखर्जी एका महिला पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णांनी बारीचशी उपोषणे केली. सामान्य माणसांसाठी त्यांनी कशाप्रकारे संघर्ष केले हे या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यासह त्यांच्या लहानपणापासूनचा प्रवासही दाखवण्यात आला आहे. 14 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता वाढली आहे.

Loading Comments