'दगडी चाळ'नंतर आता 'यंटम'

 Pali Hill
'दगडी चाळ'नंतर आता 'यंटम'
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मुंबईतली शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंट या कंपनी 'यंटम' या हटके चित्रपटाची निर्मिती करणार आहे.'चुकीला माफी नाही' म्हणत 'दगडी चाळ' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं. त्यानंतर निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील हे 'यंटम' चित्रपट घेऊन येणार आहेत. 'यंटम' हा बोलीभाषेतला शब्द आहे. ग्रामीण भागात हा शब्द प्रचलित आहे. हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचं दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सांगितल आहे. 'दगडी चाळ' या अँक्शनपटानंतर एका वेगळ्या कथानकाच्या शोधात होतो, असंही निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले.

Loading Comments