Advertisement

'रॉयल' पुरस्काराचा थाट!


'रॉयल' पुरस्काराचा थाट!
SHARES

मुंबई - मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या वर्षभराच्या कामगिरीची दखल घेत त्यातील उत्कृष्ट कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या आणि प्रेक्षकांसहित अवघ्या मनोरंजनसृष्टीचं लक्ष वेधून घेणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा द वेस्टीन मुंबई गार्डन,गोरेगाव येथे झाला. 9 मार्चला अगदी राजेशाही थाटात हा सोहळा पार पडला. यंदा या सोहळ्याची थीम 'रॉयल एलेगन्स' म्हणजेच 'राजेशाही थाट' अशी होती. त्यामुळे सर्व कलाकार अगदी राजेशाही थाटात दिसून आले.

या वर्षीच्या सोहळ्याचं सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर याने केलं. यावर्षीच्या झी चित्र गौरव पुरस्कारासाठी जानेवारी 2016 ते डिसेंबर 2016 या काळात प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत चित्रपटांचा विचार करण्यात आला, तर नाटकांमध्ये याच कालावधीत रंगभूमीवर दाखल झालेली नाटके (पुनरूज्जीवित नाटके वगळता) प्रवेशासाठी पात्र होती.

चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि किरण यज्ञोपवित यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात सुरेश खरे, विजय तापस आणि रविंद्र दिवेकर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी नितिन नेरुरकर, राजन ताम्हाणे आणि योगेश सोमण यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा