हजारो लीटर पाण्याची नासाडी

दहिसर - दहिसर पूर्वच्या शांतीनगरमधील पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन गेले काही दिवसांपासून फुटली आहे. या पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र कुठलाही अधिकारी या पाईपलाईनकडे लक्ष देत नसल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं. या परिसरात सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. तेवढा वेळ या पाईपलाईनमधून पाण्याची गळती सुरु असते आणि हजारो लीटर पाणी वाया जाते.

Loading Comments