Advertisement

मेट्रोनं पुर्नरोपीत केलेल्या झाडांची बघा 'अशी' झालीय दयनीय अवस्था

मेट्रोनं ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांपैकी ६१ टक्के झाडे देखरेख न केल्यानं मृत झाली आहेत, असं पाहणी केल्यानंतर लक्षात आलं आहे.

मेट्रोनं पुर्नरोपीत केलेल्या झाडांची बघा 'अशी' झालीय दयनीय अवस्था
SHARES

मुंबईत मेट्रो कारशेड बनवण्यासाठी आरेतल्या २ हजार वृक्षांची तोड करण्यात आली होती. त्यापैकी निम्म्याहून अधिक वृक्षांचे पुर्नरोपण म्हणजे ट्रान्सप्लांट केल्याचा दावा मेट्रोनं केला होता. मात्र याची पाहणी हायकोर्टानं स्थापन केलेल्या इस्पेक्शन कमिटीनं केली. मेट्रोनं ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांपैकी ६१ टक्के झाडे देखरेख न केल्यानं मृत झाली आहेत, असं पाहणी केल्यानंतर लक्षात आलं आहे

'यामुळे' दगावली रोपटी

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तोडलेल्या १ हजार ५०० झाडांपैकी १ हजार ६६ झाडांचे पुर्नरोपण केल्याचा दावा केला होता. त्यापैकी ६८४ झाडे सुरून गेली असल्याचं निदर्शनास आलं. पर्नरोपण केल्यानंतर त्याची देखरेख न घेणं, मोठ्या झाडां लगतच पुर्नरोपण करणं अशा विविध कारणांमुळे झाडे सुकून गेली


मानखुर्द

पुन्हा हायकोर्टात सुनावणी

झाडांच्या पाहणीसाठी इंस्पेक्शन कमिटीसोबत कार्यकर्ते जोरु भथेना देखील गेले होते. त्यांनी पुर्नरोपण केलेल्या झाडांची पाहणी केल्यानंतर दावा केला आहे. याप्रकणी १६ डिसेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे.  

आरेतील ट्रान्सप्लांट


काय होतं प्रकरण?

कुलाबा ते अंधेरी दरम्यानच्या मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरेच्या जंगलात कारशेड उभारण्यात येत आहे. या कारशेडसाठी सुमारे अडीच हडाराहून अधिक झाडे कापण्याची परवानगी महापालिकेनं मेट्रोला दिली होती. पर्यावरण प्रेमी या निर्णयाविरोधात न्यायालयात गेले. पण न्यायालयानं त्यावरील स्थगिती उठवली. पण मेट्रोन दोन रात्रीत १ हजार ५०० झाडे कापली. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं वृक्षतोडीला स्थगिती दिली होती.

 
हेही वाचा

'एक बीज एक सावली' पर्यावरणप्रेमींचा नवा उपक्रम

सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर


Read this story in English
संबंधित विषय