Advertisement

आरे कॉलनीत आपली भाजी, आपला मळा


आरे कॉलनीत आपली भाजी, आपला मळा
SHARES

गोरेगाव - आरे कॉलनीत दर रविवारी 'आपली भाजी आपला मळा' हा उपक्रम राबवण्यात येतोय. मुंबईकरांना स्वस्त आणि ताजी भाजी मिळावी यासाठी अनेक भागात शेतकऱ्यांचा आठवडी बाजार सुरू करण्यात आलाय. या  पार्श्वभूमीवर डॉक्टर चिन्मय बाळ यांनी स्वच्छ, ताजी आणि स्वस्त भाजी मिळावी यासाठी हा उपक्रम राबवला.

आरे कॉलनीत मॉर्निंग वॉकला नियमितपणे जाणारे खूप जण आहेत. व्यायाम केल्यानंतर घरी जाताना ताजी भाजी घेऊन जाता यावी, यासाठी सकाळी ६ वाजता या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळा सुरू होतो. पहाटे चार वाजता नाशिकहून कोबी, कांदा, बटाटा, फ्लॉवर अशा सर्व भाज्या आणल्या जातात. डॉ. चिन्मय यांचे वडील विलास बाळ यांचा शेतकऱ्यांशी दांडगा संपर्क असल्यानं ते नाशिकहून भाजी मागवतात. भाजी विक्रीसोबतच गांडुळ खत प्रकल्पही राबवला जातोय. तेव्हा येताना घरातील कचराही घेऊन या. जेणेकरून खत तयार व्हायला मदत होईल, असं आवाहन डॉ. चिन्मय बाळ यांनी केलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा