Advertisement

आरे आंदोलकांच्या अटकेबाबत आदित्य करणार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

आरे आंदोलक अटक : DYFI निदर्शना दरम्यान वरळी विधानसभेचे उमेदवार आदित्य ठाकरे आणि माजी राज्यमंत्री सचिनजी आहिर यांनी आंदोलकांची भेट घेतली...

आरे आंदोलकांच्या अटकेबाबत आदित्य करणार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
SHARES

मुंबईतल्या आरे जंगलात करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीच्या निषेधार्थ DYFI च्या वतीनं वरळी जिजामाता नगर इथं राज्य सरकारचा धिक्कार करत जोरदार घोषणा देत निदर्शनं करण्यात आली.

शनिवारी झालेल्या आंदोलना दरम्यान पर्यावरणप्रेमींना  अटक करण्यात आली. यावेळी अटक करण्यात आलेल्या सर्व युवक-युवतींवर खोटे आणि गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले, असा आरोप  DYFI नं केलाय. हे गंभीर गुन्हे तात्काळ मागे घेण्याची आग्रही मागणी DYFI तर्फे  करण्यात आली. 

DYFI निदर्शना दरम्यान वरळी विधानसभेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांची प्रचार रॕली सुरू होती. यावेळी आदित्य आणि माजी राज्यमंत्री सचिनजी आहिर यांनी आंदोलकांना भेट दिली आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांना तोंडी आश्वासन दिलं की, "अटक करण्यात आलेल्या सर्व  कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आजच चर्चा करणार आणि गुन्हे मागे घेणार."

आरे वाचवा मुंबई वाचवा, झाडांच्या कत्तली करणारे फडणवीस सरकार मुर्दाबाद, सत्ताधारी-बिल्डर अभद्र युती मुर्दाबाद, आशा जोरदार घोषणा यावेळी DYFI नं दिल्या. 


संबंधित विषय