Advertisement

माझगाव, कुलाब्यातील हवा जास्त प्रदूषित

माझगाव आणि कुलाबा इथल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला असल्याचं समोर आलं आहे.

माझगाव, कुलाब्यातील हवा जास्त प्रदूषित
SHARES

मुंबईतील माझगाव (Mazgaon) आणि कुलाब्यात (Colaba) हवेचा गुणवत्ता स्तर अतिशय वाईट असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. इथल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला असल्याचं समोर आलं आहे.

माझगावमध्ये ३१७ तर कुलाब्यात ३१३ एक्यूआयपर्यंत हा दर घसरला आहे. त्यामुळे दिवसभर मुंबईतील अनेक भागात प्रदुषित धुक्याची चादर पसरलेली दिसून आली.

राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसाचा हवेच्या गुणवत्तेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा पाऊस आता कमी झाला असला तरीही मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वातावरणात गारवा जाणवत आहे. अशा काळात जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. त्यामुळे धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात. परिणामी प्रदूषणाची पातळी वाढू लागते तर हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी खालावते.

संपूर्ण दिल्ली शहरातील हवेचा AQI ३२८ एवढा नोंदवण्यात आला आहे. मुंबई १८६, बीकेसी २१५, मालाड २०१, अंधेरी १४२, चेंबूर १५९, बोरिवली ११६ एक्यूआय असा हवेचा दर्जा नोंदवण्यात आला. त्यापैकी कुलाबा, माझगाव, बीकेसी आणि मालाड इथली हवा अतिशय वाईट दर्जाची नोंदवण्यात आली.

एवढ्या प्रदुषित हवेमुळे श्वसनाचे आजार असलेल्या लहान मुले, वृद्धांनी काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अशा हवेमुळे श्वसनविकारांचा त्रास उद्भवू शकतो. पोस्ट कोव्हिड रुग्ण, फायब्रोसिस अस्थमा असलेल्यांच्या औषधोपचारात यामुळे वाढ करावी लागू शकते.हेही वाचा

राज्यातील 'या' शहरांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा