Advertisement

राज्यातील 'या' शहरांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण

भारतातील तब्बल ४६ शहरांतील नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जगभरातील टॉप १०० प्रदुषित शहरांमध्ये भारतातील तब्बल ४६ शहरांचा समावेश आहे.

राज्यातील 'या' शहरांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण
SHARES

भारतातील तब्बल ४६ शहरांतील नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जगभरातील टॉप १०० प्रदुषित शहरांमध्ये भारतातील तब्बल ४६ शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रदुषित शहरांची देखील यादी समोर आली आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमधील एअर क्वालिटी ढासळली असल्याचं समोर आलं आहे.

बीकेसीतील नोव्हेंबरमधील सरासरी एक्यूआय 202 वर म्हणजे वाईट श्रेणीत समावेश झाला असल्याचं समोर आलं आहे. टॉप १० शहरांमधील नोव्हेंबर महिन्यातील सरासरी एक्यूआय मध्यम श्रेणीत आहे. मुंबईतील ठिकाणांसह कल्याण, नवी मुंबई आणि पुणे शहरातील ठिकाणांचाही समावेश यात झाला आहे.

पुण्यातील कोथरुडमध्ये देखील एअर क्वालिटी ढासळली आहे.  नोव्हेंबरमधील कोथरुडचा सरासरी एक्यूआय १४७ वर आहे. मेट्रोची सुरु असलेली कामं, रस्त्यांवर वाढलेली वाहनांचा संख्या, स्मॉग आणि धुळीच्या एकत्रित परिणामांमुळे परिस्थिती ढासळल्याचं निरीक्षण करण्यात आलं आहे.

यामुळं आजारी  लोकांना आरोग्यविषयक अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. वाईट श्रेणीतील हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे.

कोणत्या शहरात काय परिस्थिती? 

  • बीकेसी - २०२ एक्यूआय
  • कुलाबा - १७६ एक्यूआय 
  • कुर्ला - १६५ एक्यूआय 
  • विलेपार्ले - १६४ एक्यूआय 
  • माझगाव - १६२ एक्यूआय 
  • कोथरुड, पुणे - १४७ एक्यूआय 
  • नेरुळ, नवी मुंबई - १४६ एक्यूआय 
  • खडकपाडा, कल्याण - १३४ एक्यूआय 
  • वरळी - १३३ एक्यूआय 
  • महापे, नवी मुंबई - १२० एक्यूआय
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा