Advertisement

मुंबईसह महाराष्ट्रातील 'या' भागात अवकाळी पावसाचा इशारा

मराठवाडा, विदर्भात पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर पहायला मिळेल. तर यावेळी उकाडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल.

मुंबईसह महाराष्ट्रातील 'या' भागात अवकाळी पावसाचा इशारा
SHARES

वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे महाराष्ट्रातील काही भागाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी तडाखा सहन करावा लागणार आहे. तर पुढच्या ४८ तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भात पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर पहायला मिळेल. तर यावेळी उकाडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल.

याआधीच रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह नजिकच्या भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी गारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा दिलासा आहे.

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील ३-४ तासांत राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान निकोबार बेटांवर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये हलक्या पावसाचे रुपांतर मध्यम पावसात होण्याची दाट शक्यता आहे.



हेही वाचा

यंदा पावसाळ्यात 52 दिवस भरती

हाय गर्मी! मुंबईत पारा 40च्या पार जाणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा