Advertisement

हाय गरमी! हंगामातील सर्वाधिक उष्ण दिवस

मार्च महिन्यातील शहरातील एका दिवसातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे.

हाय गरमी! हंगामातील सर्वाधिक उष्ण दिवस
SHARES

गुरुवारी, ४ मार्च रोजी मुंबईतील पारा विक्रमी-उच्च पातळीवर गेला. त्यामुळे मार्च महिन्यातील शहरातील एका दिवसातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे.

सांताक्रूझ इथल्या (IMD) हवामान वेधशाळेत ४ मार्च रोजी कमाल तपमान ३८.०१ डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आलं. हे सामान्यपेक्षा ५.२ डिग्रीपेक्षा जास्त आहे.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. तर आर्द्रता ४०-५० टक्क्यांच्या आसपास होती.

गुरुवारी नोंदवलेलं तापमान गेल्या वर्षीच्या मार्चमधील सर्वाधिक कमाल तापमानापेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी १७ मार्चला सर्वाधिक तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.

आयएमडी कुलाबा वेधशाळेनुसार किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे २०.६ अंश सेल्सिअस तापमान होते. हे अनुक्रमे १.३ डिग्री आणि सामान्यपेक्षा ०.६ डिग्री होते. आयएमडी कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेमध्ये सापेक्ष आर्द्रता अनुक्रमे ५८ आणि ३० टक्के होती.

३ मार्च रोजी भारतीय हवामान खात्याच्या (IMD) सांताक्रूझ वेधशाळेतील कमाल तापमान ३७.३ अंश सेल्सिअस इतके होते. तर आदल्या दिवशी म्हणजेच २ मार्चला कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते.



हेही वाचा

यंदा उन्हाच्या झळा तीव्र होणार, हवामान खात्याचा अंदाज

नवी मुंबई महानगरपालिका मियावाकी पद्धतीचा करणार वापर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा