Advertisement

वांद्रे तलाव परिसराकडे महापालिकेचं दुर्लक्ष


वांद्रे तलाव परिसराकडे महापालिकेचं दुर्लक्ष
SHARES

वांद्रे - पुरातन वारसा लाभलेला वांद्रे (प.) इथला तलाव. या तलावला तब्बल दोनशे वर्ष जुना इतिहास आहे. नवपाडा येथे राहणाऱ्या श्रीमंत मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने हा तलाव बांधला होता. आता या तलवाची जबाबदारी ऐतिहासिक तलाव म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे आहे. पण या ऐतिहासिक तलावाकडे पालिका मात्र दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे.

येथे सामान्य नागरिकांना तलावाकाठी बसणे किंवा फिरणे खूपच मुश्किल झाले आहे. कारण या तलावाकाठी रोज संध्याकाळी गर्दुल्ल्यांचे वास्तवे असते. राजरोसपणे मद्यपान करणे, उघड्यावर लघुशंका तलाव परिसरात केली जाते. तसेच रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि कचरा तलावाच्या जिन्यावर विखुरलेले असतात. तलाव क्षेत्राचं विद्रुपीकरणं सुरु आहे, थोडक्यात या सर्व समस्येवर महापालिकेच्यावतीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत तसेच या ठिकाणी पोलिसांच्या व महापालिकेच्यावतीने कडक निर्देश फलक लावले गेले पाहिजेत. जेणेकरुन या ऐतिहासिक तलावाची जोपासना होईल आणि या विभागात राहणाऱ्या नागरिकांना तलावाकडे फेरफटका मारताना सुरक्षित वाटेल व मोकळ्या हवेत श्वास घेण्याचा आनंद उपभोगता येईल. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेला तसेच संबंधित पोलीस स्टेशनला विनंती केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा