Advertisement

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आणखी एक वीजनिर्मिती प्रकल्प

देवनार डम्पिंग ग्राऊंडची कचरा साठवणुकीची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्तपणे बंद केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या डम्पिंग ग्राऊंडवरील ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आणखी एक वीजनिर्मिती प्रकल्प
SHARES

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आता कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पात रोज १२०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून २५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने जागतिक पातळीवरील कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

देवनार डम्पिंग ग्राऊंडची कचरा साठवणुकीची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्तपणे बंद केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या डम्पिंग ग्राऊंडवरील ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी चेन्नई एम. एस. डब्ल्यू. प्रा. लि. कंपनीची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी ६४८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर पुढील १५ वर्षांच्या देखभालीसाठी ४०० कोटी याप्रमाणे एकूण १,०५६ कोटी रुपयांचे कंत्राट कंपनीला देण्यात येणार आहे. 

आता देवनार डम्पिंग ग्राऊंडवर १२०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याकरिता पालिकेने जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. २२ फेब्रुवारीपर्यंत कंपन्यांना प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

पहिल्या प्रकल्पात ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून रोजी ४ मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. नव्या प्रकल्पात १२०० ते १८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाईल. या प्रकल्पासाठी १०२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारल्या जाणारा हा प्रकल्प २०२४ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबईत दर दिवशी साडेहजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. यातील साडेपाच हजार मेट्रिक टन कांजुर व दीड हजार मेट्रिक टन कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. न्यायालयाने देवनारमध्ये कचरा टाकणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. 



हेही वाचा -

मुंबईत २४ तासात तब्बल 'इतक्या' कावळ्यांचा मृत्यू

हार्बर मार्गावर लवकरच धावणार गोरेगाव-पनवेल लोकल


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा