Advertisement

सायकल ट्रॅकसाठी पवई तलावातील मगरींवर अभ्यास

तलावातील मगरिंच्या लोकसंख्येसाठी पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत.

सायकल ट्रॅकसाठी पवई तलावातील मगरींवर अभ्यास
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC), पवई तलावाच्या परिघाभोवती १०.२ किमी लांबीचा, परिभ्रमण सायकल ट्रॅक  तयार करण्याचा प्रस्ताव आहे. पण तलावातील मगरिंच्या लोकसंख्येसाठी पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत. आता यासाठीच मगरींच्या लोकसंख्येचं मूल्यांकन करण्यासाठी सहा महिन्यांचा अभ्यास सुरू केला आहे.

अशा प्रकारचा अभ्यास पहिल्यांदाच केला जाणार आहे. ही पर्यावरणप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अधिकृत जनगणना कधीच झाली नसताना, महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशननं (जे तलावाच्या काठावर वसलेले आहे) प्रौध मगरींची संख्या ४०-५० असल्याचं म्हटलं आहे.

मगरींच्या अभ्यासाचा प्रस्ताव सध्या BMC कडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. याचे नेतृत्व हर्पेटोलॉजिस्ट डॉ. केदार भिडे करतील, जे प्रकल्पाच्या शाश्वत अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी BMC-नियुक्त पॅनेलमधील सहा तज्ञांपैकी एक आहेत. यामध्ये उपाययोजना करण्यासाठी पावले देखील समाविष्ट आहेत.

वायुवीजन, ताण आणि इतर वनस्पतींचे व्यवस्थापन, सांडपाणी प्रवेश थांबवणं आणि ऑक्सिजनच्या पातळीचे निरीक्षण या अभ्यासाद्वारे केलं जाईल.

“दिलेल्या क्षेत्रामध्ये मगरींची संख्या निश्चित करण्यासाठी स्वीकारल्या जाणार्‍या पद्धतीचा वापर करू. सरोवरात किती प्रौढ मगरी वास्तव्यास आहेत हे आम्हाला यामुळे समजेल. यासंदर्भात आतापर्यंत कोणताही अधिकृत अभ्यास किंवा डेटाचा अभ्यास झालेला नाही. मगरी कुठल्या भागात वास्तव्यास आहेत?, कुठे घर करतात?, पाण्यात कुठे आसरा घेतात? आणि त्यांच्यासाठी कोणते अन्न स्रोत उपलब्ध आहेत? याचाही आम्ही अभ्यास करू,” असं भिडे यांनी हिंदुस्तान टाइम्सला बुधवारी सांगितलं.

भिडे म्हणाले की, वर्षाच्या अखेरीस लोकसंख्या मोजणी आणि बास्किंग सर्वेक्षण सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तर २०२२ मध्ये, फेब्रुवारी आणि जून दरम्यान घरट्यांचे सर्वेक्षण केलं जाणार आहे. जो भारतीय दलदलीच्या मगरींचा हंगाम आहे.

“आता पावसाळा संपला आहे, आम्ही आमची फील्डवर्क सुरू करण्यापूर्वी तलावातील पाण्याची पातळी आणखी कमी होण्याची वाट पाहत आहोत. आम्ही आमचे निष्कर्ष एका अहवालात संकलित करू ज्यात सायकल ट्रॅकच्या विकासादरम्यान पालिकेनं अवलंबल्या पाहिजेत. पवई तलावात मगरी आणि इतर वन्यजीवांचा आधीपासूनच धिवास आहे,” भिडे म्हणाले.

"सायकल ट्रॅकचा वापर सार्वजनिक जागा म्हणून केला जाणार असल्यानं, जिथं मानव आणि मगरी एकमेकांच्या जवळ असतील. या SOPs चं नियोजन करणं महत्वाचं आहे. काल्पनिकपणे सांगायचे तर, जर एखादी मगर सायकल ट्रॅकवर भटकत असेल तर BMC ला प्रतिसाद कसा द्यायचा याबद्दल योग्य सूचना आवश्यक आहेत. यासाठी, आम्ही स्थानिक वन्यजीव बचाव पथकांचं पाचारण करण्याच्या विचारात आहोत ज्यांना या प्राण्यांशी सामना करण्याचा आधीच अनुभव आहे,” भिडे म्हणाले.

पवई तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये पालिकेनं सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मगरींच्या लोकसंख्येला धोका असल्याचा हवाला देत हा परिसर पर्यटकांसाठी सार्वजनिक जागा म्हणून विकसित करण्यास विरोध पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे.

"परिणाम समजून घेण्यासाठी प्रथम असा अभ्यास न करता प्रकल्प प्रस्ताव का तयार केला गेला? इतर काही विकासाच्या मार्गात आडकाठी आल्यावरच वन्यजीवांना प्राधान्य मिळते का? वनविभाग आणि वन्यजीव तज्ज्ञांनी यापूर्वी असा अभ्यास करण्याचे प्रस्तावित केले होते, परंतु ते आजतागायत प्रत्यक्षात झालेले नाहीत. त्याची गरज आहे,” असं वनशक्ती एनजीओचे संचालक स्टॅलिन डी म्हणाले.



हेही वाचा

पवई सायकल ट्रॅकसाठी एकही झाड तोडलं जाणार नाही : आदित्य ठाकरे

गोराई परिसरात खारफुटी संवर्धन केंद्र आणि उद्यान उभारण्यात येणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा