
मुंबई महापालिकेसह (brihanmumbai municipal corporation) राज्यभरातील महत्त्वाच्या आगामी निवडणुकांमध्ये (elections) ठाकरे बंधू एकत्रित ताकद लावणं निश्चित मानलं जात आहे.
ठाकरे गट आणि मनसे यांची युती अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही, मात्र दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या वाढत्या गाठीभेटी, एकत्रित मोर्चे यावरुन केवळ घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे दिसते.
अशातच जागावाटपाच्या चर्चेआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वेक्षण केले आहे. यामध्ये मुंबईत मनसेची कुठल्या भागात, किती जागांवर ताकद आहे, याचे चित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर स्पष्ट झाले आहे.
मुंबई (mumbai) महापालिकेच्या 227 पैकी तब्बल 125 जागांवर मनसेची ताकद आहे. या सव्वाशे जागांसाठी मनसेकडे चांगले उमेदवार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास ते तयार असल्याचीही माहिती आहे.
उद्धव ठाकरेंसोबत (uddhav thackeray) राज ठाकरे (raj thackeray) युती करण्याआधी मनसेने मुंबई महापालिकेच्या 227 जागांचा आढावा घेतला. त्यानुसार 125 ताकदवान जागांची यादी सादर केली.
मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना (shiv sena ubt)आणि मनसे यांचे मुंबईतील नेते, पदाधिकारी, शाखाप्रमुख, शाखा अध्यक्ष यांच्या बैठका सुरु आहेत.
मनसेची शहरात कुठे कुठे ताकद आहे, याचा आढावा बैठकांमध्ये घेतला जात आहे. मनसेने आतापर्यंत 125 जागांची यादी काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यामध्ये मुख्यत्वे माहीम, दादर, परळ, भायखळा, जोगेश्वरी, भांडूप , घाटकोपर यासारख्या मराठीबहुल भागांचा समावेश आहे.
या ठिकाणी मनसेच्या मतांची संख्या जास्त असून याआधी झालेल्या मुंबई महापालिका किंवा विधानसभा निवडणुकांतही तिथे मनसेला चांगली मतं मिळाली होती.
मुंबई महापालिकेच्या 227 पैकी तब्बल 125 जागांवर लढण्यास मनसे आग्रही आहे, असा याचा अजिबात अर्थ नाही.
ठाकरे गट आणि मनसे यांच्यात प्रत्यक्ष जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली नसली तरी दोन्ही पक्षांनी आपली ताकद अधिक असलेल्या जागा शॉर्टलिस्ट केल्या आहेत.
प्रत्यक्ष जागावाटप होईल तेव्हा मेरिटनुसार कोण कुठल्या जागेवर लढणार, हे ठरण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील वाटाघाटी झाल्यावर कोण किती जागांवर लढणार हे स्पष्ट होईल.
हेही वाचा
