Advertisement

मुंबईत थंडीचं 'कमबॅक'


मुंबईत थंडीचं 'कमबॅक'
SHARES

काही दिवस गायब झालेल्या थंडीनं मुंबईत पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. ईशान्येकडील थंड वाऱ्याचं आगमन झाल्यामुळे मुंबईतील तापमानात घट झाल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी सकाळी शहरातील तापमान १५.४ अंशापर्यंत घसरलं होतं. पुढील २४ तास हवामानात असाच गारवा राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


तापमानात घट होण्यास सुरूवात

गेल्या आठवड्यात मुंबईतून थंडी गायब झाल्याने कमाल तापमानात वाढ झाली होती. परिणामी मुंबईकरांना थंडीच्या महिन्यात उन्हाळ्याचा फिल येत होता. मात्र मंगळवारपासून तापमान पुन्हा एकदा घटण्यास सुरूवात झाली. गेल्या आठवडाभरात तापमान ३० अंशावर गेलं होतं. मात्र तापमानात घट झाल्यामुळे मुंबईत सरासरी तापमान २८ अंशावर पोहोचलं आहे. येत्या २४ तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


मुंबईचं तापमान गेल्या आठवड्यात वाढलं होतं, आता मात्र ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे. सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या तापमानानुसार मुंबईतील तापमान १५.४ अंशावर आल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील सरासरी तापमान २८ अंश असेल. पुढील २४ तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

- शुभांगी भुते, संचालक, हवामान खाते

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा