Advertisement

येत्या ५ दिवसात मुंबई आणि परिसरात पावसाची शक्यता

हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे

येत्या ५ दिवसात मुंबई आणि परिसरात पावसाची शक्यता
file photo
SHARES

मुंबईकरांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो. मान्सून (मुंबईचा पाऊस) बद्दल एक महत्वाची बातमी आहे. येत्या ५ दिवसांत राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पाचव्या दिवसापासून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली आहे.

दरम्यान मुंबईसह ठाणे परिसारत चांगली पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लातूर, बीड, नाशिक, परभणीसह हिंगोली जिल्ह्यातही पाऊस पडला आहे.

लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांनी जीवदान मिळालं आहे. दरम्यान, आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

लातूर शहर आणि परिसरात तुफान पाऊस झाला आहे. शहरालगतच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचले आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर लातूरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

परळीत झालेल्या मुसळधार पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. एक तास विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाल्यानं शेताततल्या उभी पिक माना टाकू लागली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.

गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढतांना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे.



हेही वाचा

आरेतील कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मागे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा