मुंबईत 'हुडहुडी'

 Pali Hill
मुंबईत 'हुडहुडी'
मुंबईत 'हुडहुडी'
See all

मुंबई - वर्षाच्या सुरुवातीला गायब झालेल्या थंडीने आता मुंबईमध्ये पुनरागमन केलं आहे. विशेषतः गेल्या तीन दिवसांपासून मुंबईचा पारा कमालीचा खालावला आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली घसरलं. बुधवारी तेच तापमान ११ अंशावर येऊन पोहचलं. उत्तर भारतात सुरु असलेली बर्फवृष्टी आणि विदर्भात काही ठिकाणी झालेल्या पावसाने तापमानामध्ये कमालीची घसरण झाली आहे. तर पुणे, नाशिक या ठिकाणीही तापमानामध्ये घसरण झाली. तसंच उपराजधानी नागपूरमध्येही तापमान काही अंशांनी घसरलं आहे. दरम्यान, येत्या काळात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Loading Comments