SHARE

मुंबई - मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती उच्च न्यायालयाने सलग चौथ्या आठवड्यानंतरही कायम ठेवली आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने मेट्रो स्थानकासाठी झाडांच्या कत्तलीशिवाय पर्याय नसल्याचे म्हणत स्थगिती उठवण्याची विनंती केली होती. पण न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे 16 मार्चपर्यंत स्थगिती कायम ठेवली आहे.

मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तलीविरोधात सेव्ह ट्रीने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार न्यायालयाने 9 मार्चला झाडांच्या कत्तलीला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर सलग ही स्थगिती कायम ठेवत शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यानही स्थगिती कायम ठेवली आहे. दरम्यान याआधीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने झाडे नसतील तर जगायचे कसे, का दुसऱ्या ग्रहावर जायचे असे खडेबोल एमएमआरसीला सुनावले होते. शुक्रवारी एमएमआरसीने झाड तोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगतानाच कापलेल्या झाडांच्या मोबदल्यात कशाप्रकारे मोठ्या संख्येने झाडे लावली जाणार आहेत याची माहिती दिली. दरम्यान याचिकाकर्त्यांनी एमएमआरसीकडून उल्लंघन होत असल्याने अनेक नियमांच्या उल्लंघनाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. त्यानुसार न्यायालयाने 16 मार्चनुसार स्थगिती कायम ठेवली आहे. महिनाभर झाडांच्या कत्तलीची स्थगिती कायम असल्याने चर्चगेट, कुलाबा आणि कफ परेडमधील कामावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या