Advertisement

गुलाबनंतर आता 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रावर होणार 'हे' परिणाम

बंगालच्या (Bay of Bengal) उपसागरावर आणखी एक चक्रीवादळ 'शाहीन' तयार होऊ शकते

गुलाबनंतर आता 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रावर होणार 'हे' परिणाम
SHARES

भारतीय हवामान विभागानं (IMD) इशारा दिला आहे की, 'गुलाब' चक्रीवादळ (Cyclone) कमकुवत झाल्यानंतर बंगालच्या (Bay of Bengal) उपसागरावर आणखी एक चक्रीवादळ 'शाहीन' तयार होऊ शकते. अधिक माहिती देताना, IMDनं म्हटलं आहे की, बंगालच्या उपसागरात उदयास आलेल्या गुलाब चक्रीवादळाचा पुन्हा २-३ दिवसात 'शाहीन' चक्रीवादळ म्हणून जन्म होऊ शकतो.

'शाहीन' (Shaheen) हे नाव कतारनं दिलं आहे जे हिंदी महासागरातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या नावासाठी सदस्य देशांचा एक भाग आहे.

IMD नं दिलेल्या माहितीनुसार शाहीन हे चक्रीवादळ गुलाबपेक्षा भयन्कर आणि तीव्र असणार आहे. हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिमी तटांवर न धडकता समुद्रातुनच ओमानच्या दिशेनं निघून जाणार आहे. मात्र याचा प्रभाव महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये पडणार आहे. या राज्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असणार आहे.

पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दोन दिवसात छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत पोहोचणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार ते ३० सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. इथं आल्यावर ते आपला स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. या वादळाच्या हालचालींवर IMD चं सतत लक्ष आहे.

अधिक तपशील देताना, आयएमडीनं असंही म्हटलं आहे की, गुजरात प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकण आणि गोवा या भागांमध्ये वेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यनाम, तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर आंतरिक कर्नाटक, तामिळ या भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'गुलाब' वादळानं फक्त ओडिशा आणि आंध्रप्रदेशमधेच नाहीतर छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधेही हाहाकार माजवला आहे. पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

तर पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.हेही वाचा

२७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईत मुसळधार पाऊस, IMD कडून इशारा

ठाणे मनपाचे ४ अधिकारी निलंबित, रस्त्यावरील खड्ड्यांसाठी ठरवले दोषी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा