Advertisement

गुलाब चक्रिवादळचा धोका, महाराष्ट्रही अलर्टवर

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गुलाब चक्रिवादळचा धोका, महाराष्ट्रही अलर्टवर
SHARES

हवामान खात्यानं चक्रीवादळाचा अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळाचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी घोंघावणाऱ्या चक्रिवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे.

कुलाबा वेधशाळेनं सावधानतेचा इशारा दिला आहे. राज्यात चक्रीवादळ धडकणार नसले तरी वाऱ्यांचा वेग अधिक असेल. त्यामुळे पावसाचा मोठा तडाखा बसू शकतो, असे भाकीत वर्तवण्यात आलं आहे. त्यामुळे सप्टेंबर संपता संपताच पाऊस पुन्हा राज्यात जनजीवन विस्कळीत करणार असल्याची चिन्हे आहेत.

बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्र होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. रविवारी संध्याकाळी २६ तारखेला चक्रिवादळ ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणामध्ये २६, २७, २८ सप्टेंबरला वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा मुख्य परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि कोकणामध्ये याचा परिणाम अधिक दिसण्याची शक्यता आहे.हेही वाचा

दिल्ली, अहमदाबादची हवा मुंबईपेक्षा जास्त विषारी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा