मुंबईत पावसाच्या सरी

मुंबईत पावसाच्या सरी
See all
मुंबई  -  

मुंबईत सोमवारी सकाळी 9 वाजता मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे गर्मीमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडा का होईना, पण दिलासा मिळाला आहे . मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड परिसरात काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मुंबईत रविवार सकाळपासूनच बदलीचे वातावरण आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईतील पूर्व- पश्चिम उपनगरात तसेच शहरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता. 2 जूनपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस मुंबईत पडू शकतो, असे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.