Advertisement

मिशन 'पळसदरी' धबधबा


मिशन 'पळसदरी' धबधबा
SHARES

पावसाळा सुरू झाला की सर्वांनाच वेध लागतात ते पिकनिकचे. धबधब्याखाली पावसात मनसोक्त भिजायचं, उंचावरून कोसळणारा प्रवाह अंगावर झेलायचा, धुक्यातलं वातावरण अनुभवायचं, हा मुंबईकरांचा पावसाळ्यातला कार्यक्रम. शनिवार-रविवार लागून सुट्टी मिळाली की, पावसाळी पिकनिकला जाण्यासाठी सगळ्यांचे बेत आखले जातात. मुंबईतले स्पॉट असो वा मुंबईबाहेरचे, पावसाळ्यात अनेक स्पॉट पर्यटकांनी गजबजलेले असतात


निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलेले पर्यटक मात्र एक गोष्ट विसरतात ती म्हणजे त्या परिसराची स्वच्छता. धबधब्याजवळचा परिसर म्हटला की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते केवळ एकच चित्र आणि ते म्हणजे दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, पेपरप्लेट्सचा कचरा. निसर्गानं आपल्याला भरपूर काही दिलं. पण आपण त्याची अजिबातच तमा बाळगत नाही. त्यामुळे या निसर्गरम्य स्थळांची दुर्दशा होत चालली आहे. पण हे चित्र पालटण्यासाठी 'एन्व्हायर्नमेंट लाईफ' या संस्थेनं पुढाकार घेतला आहे.


मोहिमेसाठी सायकल राईडचं आयोजन

धर्मेश बराई यांनी सुरू केलेल्या 'एन्व्हायर्नमेंट लाईफ' या संस्थेतर्फे वॉटरफॉल क्लिनअप मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात केली जाणार आहे. हा त्यांचा पाचवा क्लिनअप ड्राइव्ह असेल. यावेळी धर्मेश बराई खोपोलीतल्या पळसदरी धबधब्याजवळ क्लिनअप ड्राइव्ह राबवणार आहेत.१० जून म्हणजेच रविवारी या क्लिनअप ड्राइव्हचं आयोजन केलं असून त्यांचा दहावा वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉल क्लिनअपसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं, यासाठी धर्मेश बराई यांनी सायकल राईडचं आयोजन केलं होतं. सीएसटीएमच्या एनसीपीए अकादमीजवळून सुरू झालेली ही सायकल राईड परेलमध्ये समाप्त झाली



पळसदरीला कसं जायचं

तुम्हीही या क्लिनअप ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ शकता. यासाठी १० जूनला सकाळी ८.३० वाजता पळसदरी रेल्वे स्टेशनला एकत्र येऊ शकता. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ही मोहिम चालणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौकफाट्यापासून १८ किमी. दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी. अंतरावर पळसदरी धबधबा आहे. रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दी असते. अधिक माहितीसाठी तुम्ही धर्मेश बराई (9773274296) यांच्याशी संपर्क साधू शकता. याशिवाय 'एन्व्हायर्नमेंट लाईफ' फेसबुक पेजला देखील तुम्ही भेट देऊ शकता.  


गेल्या वर्षी ९ धबधबे स्वच्छ

गेल्या वर्षी त्यांनी कर्जत, नेरुळ, वसईत, खारघर, बदलापूर इथले आठ धबधबे स्वच्छ केले आहेत. नंदवाडी, जुम्मापट्टी, टपालवाडी, झेनिथ, चिंचोटी, कोंडेश्वर, पांडवकडा आणि भीवपूरी या धबधब्यांवर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. 'इन्व्हायर्नमेंट लाईफ' या संस्थेच्या सदस्यांनी सुरू केलेल्या मोहिमेला गेल्या वर्षी हातभार लावला तो मुंबईतील कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी, उमरोली आणि आशाणे ग्रामपंचायत सदस्यांनी, स्थानिक गावकऱ्यांनी आणि काही ट्रेकर्स ग्रूपनी. या स्वच्छता मोहिमेत मुंबईतील जीटीबी नगरचे गुरुनानक महाविद्यालय, नेरळ विद्यामंदिर, जे. जे. कॉलजेचे काही विद्यार्थीही सहभागी होते


हेही वाचा -

कांदिवलीतील 'बोलक्या भिंती'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा