Advertisement

याला वॉटरफॉल म्हणावे की दारूचे अड्डे?


याला वॉटरफॉल म्हणावे की दारूचे अड्डे?
SHARES

पावसाळ्यात धबधब्यांवर जाऊन आपण अक्षरश: धम्माल करतो... मजा, मस्ती यासोबतच आपण आणखी एक गोष्ट करतो ती म्हणजे उकिरडा. धबधब्याजवळचा परिसर म्हटला की, डोळ्यासमोर उभं राहतं ते केवळ एकच चित्र आणि ते म्हणजे दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पेपरप्लेट्सचा कचरा... 



पावसाळ्यात निसर्गरम्य स्थळांना भेट देणं हे प्रत्येकाच्या प्लॅनिंगमध्ये असतं. पण या निसर्गरम्य स्थळांची स्वच्छता राखणं याचं कधी प्लॅनिंग केलं आहे का? मला खाञी आहे याचं उत्तर तुमच्याकडे नसेल. पण एक अशी संस्था आहे जी या निसर्गाचं सौंदर्य टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 'एन्व्हायर्न्मेंट लाइफ' या संस्थेच्या काही तरूणांनी एकञ येत वाॅटर क्लिनअप ड्राइव्ह सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत त्यांनी नऊ वॉटरफॉल स्वच्छ केले. नुकताच या तरूणांनी खोपोली इथला पळसदरी वॉटरफॉल स्वच्छ केला.



मिशन 'पळसदरी'

पळसदरी हा त्यांचा दहावा वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉल परिसरातून 'एन्व्हायर्न्मेंट लाइफ'च्या सदस्यांनी 600 किलो दारूच्या बाटल्या आणि दहा किलो प्लास्टिक गोळा केले. या उपक्रमात ग्रामस्थ, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि तिथे उपस्थित काही पर्यटकांनी देखील सहभाग घेतला. 


कशी झाली या मोहिमेला सुरुवात?

'एन्व्हायर्न्मेंट लाइफ'चे धर्मेश बराई यांनी या मोहिमेला सुरुवात केली. धर्मेश भराई हे खोपोलीच्या झेनिथ वॉटरफॉलवर गेले होते. तिकडचं दृश्य भयानक होतं. सर्वीकडे दारूच्या बाटल्या, काचा कचरा, प्लॅस्टिक पडलेला होता. कित्येकांच्या पायाला त्या काचा लागत होत्या. त्यांनी ३० हून अधिक वॉटरफॉलला भेट दिली आहे. सर्वीकडे एकच चित्र. हे चित्र पाहून त्यांना जाणवलं की खरच इथे क्लिनअपची गरज आहे. पण सुरुवात कशी करायची हे त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे  गुगलवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना चायनाचा एक व्हीडिओ सापडला. तिकडे वॉटरफॉल क्लिनअप ड्राइव्ह उपक्रम राबवला जातो. त्यावरून त्यांना 'वॉटरफॉल क्लिनअप ड्राइव्ह'ची संकल्पना सुचली.

धर्मेश यांनी सुरू केलेला उपक्रमाअंतर्गत ९ वॉटरफॉल क्लीन केले. गेल्यावर्षी त्यांनी कर्जत, नेरुळ, वसईतले, खारघर, बदलापूर इथले आठ धबधबे स्वच्छ केले आहेत. आनंदवाडी, जुम्मापट्टी, टपालवाडी, झेनीथ, चिंचोडी, कोंडेश्वर, पांडवकडा आणि भिवपुरी या धबधब्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावर्षी देखील धर्मेश बराई अनेक वॉटरफॉलवर स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. तुम्ही या मोहिमेत सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी 'एन्व्हायर्न्मेंट लाइफ'च्या फेसबुक पेजला भट द्या. 



दारूच्या बाटल्यांचा खच

पावसाळ्यात पर्यटनामुळे नक्कीच आसपासच्या गावकऱ्यांना रोजगार मिळतो. पण एका नाण्याच्या दोन बाजू असतात ना, त्याचप्रमाणे गावकऱ्यांना पर्यटकांच्या काही गोष्टींमुळे त्रासही होतो. दारू पिऊन पर्यटक येतात किंवा तिथेच दारू पितात. त्यामुळे काही अनुचित घटना घडण्याची भिती त्यांच्यात असते. गावकरी वॉटरफॉलला गेली की, त्यांना या काचेच्या बाटल्यांमुळे दुखापत होते.

मुंबईजवळ असलेले लोकल टुरिझम स्पॉर्ट्स हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंटनं खालील गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

१) धबधबा परिसरात दारू नेण्यावर बंदी आवश्यक
२) चेंझिग रूम आणि शौचालय या सोईसुविधांचा आवश्यक्ता
३) देखरेखीसाठी सुरक्षा गार्ड किंवा पोलीस तैनात करण्याची गरज
४) सर्व वॉटरफॉलजवळ माहिती देणारे बोर्ड असले पाहिजेच. वॉटरफॉलचं नाव, तो वॉटरफॉल कोणत्या झोनमध्ये येतो? त्या झोनचा कोण हेड आहे? ही प्राथमिक माहिती तिकडे असली पाहिजे.
५) काय करावं आणि काय करू नये याचे सूचना फलक लावले पाहिजेत.
६) लोकल टुरिझमला प्रमोट करून त्याला अर्निंग सोर्स बनवता येऊ शकतो. वॉटरफॉल सारख्या जागी प्रवेश फी आकारली गेली पाहिजे. जेणे करून याचा फायदा महाराष्ट्र टुरिझमला होईल.
७) काही ठिकाणी कचऱ्याचे डबे नसतात. त्यामुळे कचऱ्याचे डबे जागोजागी लावले पाहिजेत.
८) मुंबईजवळील वॉटरफॉल्सच्या ठिकाणी विकास झाला तर तिथल्या गावकऱ्यांनाही रोजगार मिळू शकतो. 


जेवढी जबाबदारी ही प्रशासनाची आहे तेवढीच जबाबदारी ही आपली सुद्धा आहे. लक्षात ठेवा आपण जे पर्यावरणाला देतो त्याचीच पर्यावरण एक ना एक दिवस परतफेड करेल. त्यामुळे आता निर्णय तुमचा आहे.



हेही वाचा

पर्यावरणप्रेमींचा दणका, दादरमधील झाडांच्या छाटणीचं काम बंद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा