Advertisement

शिवडीत पक्षीप्रेमींसाठी फ्लेमिंगो वॉच


शिवडीत पक्षीप्रेमींसाठी फ्लेमिंगो वॉच
SHARES

शिवडी - पर्यावरणात जसे समुद्र, नद्या, झाडे, झुडपे, यांना महत्त्व आहे तितकेच महत्व पक्षांनाही असल्याने खास पक्षीप्रेमींच्या दर्शनासाठी यंदा बॉम्बे नॅच्यूरल हिस्ट्री सोसायटी (बिएनएचएस) या संस्थेच्या वतीने 'फ्लेमिंगो वॉच' हा उपक्रम 16 आणि 30 एप्रिलला शिवडी जेट्टीवर राबविण्यात येणार आहे.

बिएनएचएस संस्था मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहयोगाने शिवडी जेट्टीवर दरवर्षी हा उपक्रम राबवित असते. यंदाचे या उपक्रमाचे 10 वे वर्ष असून, हजारो गुलाबी सुंदर फ्लेमिंगो पक्षी पक्षीप्रेमींना जवळून पाहता येणार आहेत. फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यात मुंबईतील खाडी परिसरात दाखल होत असून, मान्सून सुरु होण्यापूर्वी पुढील प्रवासाला निघतात. 

खाडीत अोहोटी सुरु झाल्यानंतर पुढील 2 तास या पक्षांना जवळून पाहणे शक्य आहे. त्यानुसार फ्लेमिंगो वॉच या उपक्रमाचे वेळापत्रक तयार केले जात असल्याचे बिएनएचएस संस्थेचे जनसंपर्क अधिकारी बिलवडे काळे यांनी सांगितले. उपक्रमाविषयीच्या अधिक माहितीसाठी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 वा. या कालावधीत 022-22871202, 22821811 अथवा atbnns.programmes@gmail.com यावर माहिती मागवू शकता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा