Advertisement

5-6 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

5-6 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार
SHARES

मुंबईसह, ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. मुंबईत पावसानं उघडीप दिल्यामुळं उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, रात्री पाऊस झाल्यानं हवेत गारवा निर्माण झाला आहे.

बुधवारी सकाळपासून मुंबई आणि आसपासच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. 5 आणि 6 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने मुंबईत 5 आणि 6 ऑगस्टपासून पावसाची शक्यता आहेया काळात तापमानात किमान २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

पुढील ४८ तासांत शहरात अंशत: ढगाळ वातावरण राहील आणि उपनगरातही हलका पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. येत्या 24 तासांत किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

IMD ने म्हटले आहे की, मुंबईसह कोकण भागात 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शहरात गेल्या 15 दिवसांपासून फारच कमी किंवा खूप हलका पाऊस झाला आहे.

IMD नुसार, 1 जून ते 2 ऑगस्ट या कालावधीत सांताक्रूझ वेधशाळेत 1549.9 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा वेधशाळेत याच कालावधीत 1304.4 मिमी पावसाची नोंद झाली. 6 आणि 7 ऑगस्टच्या शनिवार व रविवारपर्यंत मुंबई आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून NDRF आणि SDRF च्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1)-2, पालघर-1, रायगड-महाड-2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1 येथे एकूण 12 पथके तैनात करण्यात आली आहेत.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) दोन तुकड्या नांदेड-1, गडचिरोली-1 तैनात करण्यात आल्या आहेत.हेही वाचा

आरेत झाडांवर कुऱ्हाड, पोलिस बंदोबस्तात मेट्रो कारशेडचे काम सुरू?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा